Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:7
22 Iomraidhean Croise  

तथापि तो म्हणाला, “त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.”


चांगल्या मातीत पडलेले बी म्हणजे जे वचन ऐकून ते सालस व शुद्ध अंतःकरणात धरून ठेवतात आणि फळ देईपर्यंत धीर धरतात.


जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे.


येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे.


योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’


परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.


मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या शुभवर्तमानाची मी यहुदीतर लोकांत घोषणा करत असतो, त्याविषयी तेथील नेत्यांना एक खासगी सभा घेऊन निवेदन केले. माझे भूतकालीन किंवा वर्तमानकालीन सेवाकार्य व्यर्थ ठरू नये, म्हणून मी हे केले.


कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात.


माझ्या मुला तीमथ्य, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाणीनुसार हा आदेश मी तुला देऊन ठेवतो की, तू त्या संदेशाद्वारेच श्रद्धेने व चांगल्या सदसद्विवेकबुद्धीने सुयुद्ध कर.


श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.


हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;


तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ.


परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.


धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.


तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तुला शक्‍ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही!


तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले, “तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे ठार मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan