Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:17
35 Iomraidhean Croise  

जेव्हा तुम्हांला त्यांच्यापुढे नेतील, तेव्हा कसे बोलावे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका. ते तुम्हांला त्याच वेळी सुचवले जाईल.


प्रिय थियफील, आपल्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतान्त लिहिण्याचे काम अनेक लोकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे.


मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.


ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे.


परंतु त्याने मला म्हटले, ‘माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस पोहचते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे


ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो.


माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा.


ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही.


अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या ठिकाणी माझ्या बाबतीत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तुला ठाऊक आहे. त्या सर्वांतून प्रभूने मला मुक्त केले.


परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.


आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे.


त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली,


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan