Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की:

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:1
35 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


तो म्हणाला, “आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने एक उमराव दूर देशी जायला निघाला.


तो राजा होऊन परत आल्यावर त्याच्या दासांनी व्यापारात काय काय मिळविले, हे पाहावे म्हणून त्याने त्यांना स्वतःकडे बोलावण्यास सांगितले.


तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.”


त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.


कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”


मी घोषित करीत असलेल्या शुभवर्तमानानुसार असे होणार आहे. माणसांच्या गुप्त विचारांचा न्याय ज्या दिवशी देव येशू ख्रिस्ताद्वारे करील, त्या दिवशी हे उघड होईल.


तुमचे खरे जीवन ख्रिस्त आहे आणि तो जेव्हा प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर वैभवाने प्रकट केले जाल!


मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.


देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.


तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.


सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची पारख अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे त्याचे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांत पर्यवसान व्हावे.


परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे.


म्हणजे जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला वैभवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.


आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.


त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा सर्वोच्च गौरवशाली देवाकडून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे!’


तर आता मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, ह्यासाठी की तो प्रकट होईल, तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापुढून लाजेने माघार घ्यावी लागू नये.


पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan