Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:16
43 Iomraidhean Croise  

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”


येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?


त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली?


पण असे झाले, तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, असे म्हणणारे धर्मशास्त्रलेख कसे पूर्ण होतील?”


मात्र संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” त्या वेळी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.


येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.


कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’


आणि ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि धर्मशास्त्रलेखाचा भंग होत नाही,


जो कोणी वाईट कृत्ये करतो, तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.


“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले, ते पूर्ण होणे आवश्यक होते.


त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते. तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी उचित प्रकारे सांगून शिकवण देत असे, तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता.


जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की,


जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी.


अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे,


सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.


‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे,


सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो.


‘देव यहुदीतर लोकांना विश्वासाने नातिमान ठरविणार,’ ह्या धर्मशास्त्रलेखातील भाकितामुळे अब्राहामला पूर्वीच हे शुभवर्तमान सांगण्यात आले होते की, ‘तुझ्यामध्ये यहुदीतर आणि सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.’


विरोध करणाऱ्यांना नम्रतेने शिक्षण देणारा, असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल


शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.


विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.


ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,


वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan