Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:15
38 Iomraidhean Croise  

येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.


कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल; त्याने द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करायचे नाही; आईच्या उदरात असल्यापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.


ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती.


मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?”


त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले.


परंतु जर तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा काय विश्वास ठेवाल?”


त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.”


त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले.


पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते.


तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला.


ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त ओरडून म्हणाला, “पौल, तू वेडा आहेस! अतिशिक्षण मिळवल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!”


हे शुभवर्तमान देवाचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याविषयी आहे. ह्या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांद्वारे पूर्वीच अभिवचन दिले होते.


हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे.


आणि तुझ्याकडे धर्मशास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील.


जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.


बापांनो, आपल्या मुलांना राग येईल अशा प्रकारे वागवू नका, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.


मी येईपर्यत पवित्र शास्त्राचे सार्वजनिक वाचन, बोध व धर्मशिक्षण ह्यांच्याकडे लक्ष दे.


देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,


तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.


त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.


तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan