Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या ठिकाणी माझ्या बाबतीत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तुला ठाऊक आहे. त्या सर्वांतून प्रभूने मला मुक्त केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभूनेच मला सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:11
43 Iomraidhean Croise  

ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले.


पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.


त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता.


म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे.


असे त्यांच्यांत कडाक्याचे भांडण चालले असता ते पौलाच्या चिंधड्या उडवतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.


इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन.


तथापि देवाकडून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांना साक्ष देत आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यानी व मोशेने सांगितले त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही,


माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.”


ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे.


कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते.


तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात.


ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.


मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan