Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:10
27 Iomraidhean Croise  

म्हणूनच, महाशय, ह्या सर्व माहितीचा मुळापासून काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की, त्या आपणासाठी व्यवस्थितपणे लिहून काढणे उचित ठरेल.


तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.”


ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत.


ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून माझा जीवनक्रम कसा होता,


तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;


तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय?


त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही.


तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे.


आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.


मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.


तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध अंत:करणाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर यथोचित संबंध, विश्वास, प्रीती व शांती ह्यांचा पाठपुरावा कर.


शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.


लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील,


मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे.


सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे.


विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.


ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan