Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 जर कोणी दुष्टपणापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो सन्मानासाठी पवित्र केलेले, प्रभूला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तयार केलेले असे पात्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वत:ला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:21
21 Iomraidhean Croise  

परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.


तर पापाचे जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही नवीन बेखमीर गोळ्यासारखे पूर्णपणे शुद्ध व्हावे. माझी खातरी आहे की, तुम्ही खरोखर तसेच आहात; कारण आपला ओलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले आहे.


प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.


सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे.


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.


हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.


अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो.


मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यांपैकी कित्येकांचा उपयोग विशेष प्रसंगी केला जातो व काहींचा सामान्य कार्यासाठी केला जातो.


ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.


लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे.


ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.


आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.


हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत


प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची पारख अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे त्याचे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांत पर्यवसान व्हावे.


जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan