Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्यागोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:2
33 Iomraidhean Croise  

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”


सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे.


प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण?


कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.


परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो!


आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची क्षमता देवाकडून आलेली आहे.


आमचा प्रिय सहकारी दास, एपफ्रास हा आमच्या वतीने तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू प्रसेवक असून त्याच्याकडून तुम्ही ही कृपा जाणून घेतली.


ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो.


माझ्या मुला तीमथ्य, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाणीनुसार हा आदेश मी तुला देऊन ठेवतो की, तू त्या संदेशाद्वारेच श्रद्धेने व चांगल्या सदसद्विवेकबुद्धीने सुयुद्ध कर.


तुझ्यावर वडीलजनांनी हात ठेऊन प्रार्थना केली, त्या वेळी संदेशाद्वारे मिळालेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.


श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.


परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.


तू मात्र ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.


म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी विश्वसनीय व दयाळू प्रमुख याजक व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan