Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ते सत्यापासून बहकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे, असे म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ते सत्याविषयी चुकले आहेत; पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांनी सत्याचा मार्ग सोडला आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे, अशी घोषणा करीत अनेकांचा विश्वास नष्ट केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:18
16 Iomraidhean Croise  

त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल.


येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.


खडकाळ जमिनीवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात व आनंदाने वचन ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात पण कसोटीच्या वेळी बहकून जातात.


परंतु ते देवाचे असल्यास, तुम्हांला ते नाहीसे करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधक ठराल!” न्यायसभेने गमलियेलचे सांगणे मान्य केले.


तुमच्यामध्ये दुही असावी कारण त्या दुहीमुळे खरे कोण आहेत हे उघड होईल.


आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत असताना मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?


तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.


कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले,


कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.


कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.


तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात.


त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत;


माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी परत फिरविले,


जरी आपल्यातूनच ते निघून गेले कारण ते आपले नव्हते. ते आपले असते, तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नव्हता, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan