Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्‍यांच्या नाशास कारण होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:14
30 Iomraidhean Croise  

कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.


जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका.


खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो.


प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;


बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.


व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे.


हे सोडून कित्येक लोक निरर्थक चर्चेकडे वळले आहेत.


शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.


देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,


मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर;


अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो.


मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे.


देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,


ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.


विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.


तरी मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हांला त्याची आठवण देऊन जागृत ठेवणे, हे मला उचित वाटते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan