Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:10
29 Iomraidhean Croise  

ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.


कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.


कर्ण्याच्या नादाबरोबर तो त्याच्या दूतांना चोहीकडे पाठवील व ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करतील.


तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.”


आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता.


जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे.


त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय?


जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.


दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.


जर आमच्यावर संकट येते, ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि जर आम्हांला सांत्वन मिळते, तर ते तुमचे सांत्वन करता यावे म्हणून मिळते, म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सहन करतो, तीच दुःखे धीराने सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळावे.


मी तुमच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर फारच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?


हे सर्व काही तुमच्याकरिता आहे आणि देवाची कृपा जशी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तशी ते देवाच्या गौरवासाठी अधिक आभारप्रदर्शनात्मक प्रार्थना करतील.


आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.


म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत.


तुमच्यासाठी माझ्या दुःखांमध्ये मी आनंद मानतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे, ते मी माझ्या देहाने, त्याचे शरीर म्हणजे ख्रिस्तमंडळीसाठी भरून काढत आहे.


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे.


देवाने तुम्हांला आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.


देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,


माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा.


ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो.


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुमच्यावर दया झाली नव्हती, आता तर दया झाली आहे.


आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan