Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3-4 मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3-4 मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 1:3
21 Iomraidhean Croise  

आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे.


“मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.


पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी लावून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवापुढे उचित प्रकारे वागत आलो आहे, हे मी तुम्हांला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगतो.”


तरीही मी आपणासमोर इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते चुकीचा मार्ग म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो


ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.


तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे.


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की,


खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.


माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती.


मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की,


आम्ही रात्रंदिवस अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला प्रत्यक्ष पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणिवा दूर कराव्यात.


कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले,


ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी.


जी विधवा खरोखरीची विधवा आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते.


तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.


त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुगे सारखाच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan