Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आपणांमध्ये वस्ती करणार्‍या पवित्र आत्म्याच्या योगे तुझ्या स्वाधीन केलेली ती चांगली ठेव सांभाळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 1:14
21 Iomraidhean Croise  

म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?


जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील.


सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.


ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.


जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कृत्ये ठार मारलीत तर जगाल.


मात्र तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जर वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही; आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही.


तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसती करतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचे मालक नाही. तर तुम्ही प्रभूचे आहात;


हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे.


तर मग आत्तापासून आम्ही कोणाचा मानवी मापदंडाने न्याय करीत नाही. जरी आम्ही ख्रिस्ताला एकेकाळी मानवी दृष्टीकोणातून ओळखले होते, तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


उलट, ज्याप्रमाणे सुंता झालेल्या म्हणजेच यहुदी लोकांना शुभवर्तमान घोषित करण्याचे काम देवाने पेत्रावर सोपवले होते त्याचप्रमाणे सुंता न झालेल्या लोकांना म्हणजेच यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्याचे काम देवाने माझ्याकडे सोपवले आहे, हे त्यांनी ओळखले


देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात.


द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा.


युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे.


पवित्र आत्म्याला विझवू नका.


धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे.


हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;


ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे.


पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील.


प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan