Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 1:10
58 Iomraidhean Croise  

तुझे शरीर जर प्रकाशमय असेल म्हणजेच त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर सर्व काही उजळून निघेल - अगदी दिवा त्याच्या ज्योतीने तुला उजळून टाकतो तसा.”


त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहायला येत आहे परंतु मला काही फळ आढळत नाही म्हणून ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’


तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे!


जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता.


येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.


परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्‍वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.


ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरून आम्ही विश्वास ठेवतो असे नाही, तर आम्ही स्वतः ऐकले आहे व आम्हांला समजले आहे की, हा खरोखर जगाचा तारणारा आहे.”


तरी पण शाश्वत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही.


ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार इस्राएलला तारण्यासाठी येशू आला आहे.


त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले.


हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्र रद्दबातल करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्र उचलून धरतो.


हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला;


जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.


म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची प्रशंसा करील.


जे आम्ही ह्या मंडपात आहोत, ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. आमच्या ऐहिक शरीराचा त्याग करावा अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर स्वर्गीय वस्त्र परिधान करावे अशी इच्छा आम्ही बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे, ते जीवनाच्यायोगे संजीवित व्हावे.


जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात.


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी


स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.


मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.


देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,


म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.


देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की,


जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला,


पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला.


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.


ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.


आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू आणि तारणारा ह्याने प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.


हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.


आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे.


त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.


तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.


आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य!


पवित्र आत्मा व वधू हेही म्हणतात, “ये.” हे ऐकणारा प्रत्येक जणदेखील म्हणो, “ये” आणि जो तहानलेला आहे व ज्याला हवे आहे त्याने यावे व जीवनाचे पाणी दान म्हणून स्वीकारावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan