Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि आम्हाला प्रभूमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 3:4
18 Iomraidhean Croise  

जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”


बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खातरी झाली आहे.


यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे.


जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.


कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे, असे त्याने समजावे.


सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.


म्हणूनच मी तुम्हांला पहिले पत्र लिहिले होते, ज्यामुळे मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद होईल, त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हां सर्वांविषयी अशी खातरी आहे की, माझा आनंद तो तुमच्या सर्वांचा आनंद आहे.


हे मी जे लिहिले होते त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही, हे मला पहायचे होते.


म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवीत आहोत. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.


मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील.


ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.


प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा;


अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी.


अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.


बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.


तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan