Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा, ज्यामुळे तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या संदेशाचा त्वरेने प्रसार व्हावा व तो सन्मानाने स्वीकारला जावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा की, तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता इतर गोष्टीसंबंधाने, बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूचा संदेश वेगाने पसरावा व त्यास सन्मान मिळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 3:1
22 Iomraidhean Croise  

म्हणून पिकाच्या धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत ह्याकरिता त्याच्याकडे प्रार्थना करा.”


त्याने त्यांना म्हटले, “पीक उदंड आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत ह्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा.


दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.


ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले.


अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.


बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की, माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर कळकळीने प्रार्थना करा.


कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे.


तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.


ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी


आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.


मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही.


बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे.


दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;


निरंतर प्रार्थना करा.


बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.


ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan