Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 2:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्या अनाचाऱ्याचे आगमन सैतानी कार्यात दिसून येते. तो सर्व सामर्थ्य, चिन्हे, खोटे चमत्कार

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9-10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 2:9
31 Iomraidhean Croise  

एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला.


कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.


येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”


कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील.


तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते.


येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुत गोष्टी पाहिल्यावाचून विश्वास ठेवणार नाही.


तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.”


तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे.


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो!


सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.


त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता.


यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत,


ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे.


तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते, त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.


तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.


दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चमत्कार करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले.


नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.


अथांग विवराचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हिब्रू भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि ग्रीक भाषेतले त्याचे नाव अप्रूओन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan