Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 2:8
34 Iomraidhean Croise  

जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो.


शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत.


मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”


आणि जगातील ज्या क्षुल्लक, तिरस्करणीय व नगण्य गोष्टी देवाने ह्याच्यासाठी निवडल्या की, जे अस्तित्वात आहे ते त्याने शून्यवत करावे,


कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.


आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ.


परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.


देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल.


वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे.


काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती.


जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही.


त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता.


देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता.


त्याने राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवील.


म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन.


नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan