Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 2:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 व ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुष्ट फसवेगिरीचा प्रयोग करील कारण त्यांनी तारणासाठी ज्या सत्याचे स्वागत करून आवड धरायला हवी होती, ते केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 2:10
29 Iomraidhean Croise  

त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही.


देवाने त्याच्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.


मात्र मी मानवी साक्ष स्वीकारत नाही. तरी पण तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.


बंधुजनहो, माझ्या इस्राएली लोकांचे तारण व्हावे ही माझी मनीषा व देवाजवळ विनंती आहे.


कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.


तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले


कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, अशा आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे, कारण


जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. आमच्या प्रभो, ये!


हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.


म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.


कारण तारण होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसाठी आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा सुगंध आहोत;


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.


त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


यहुदीतरांचे तारण व्हावे म्हणून आम्ही संदेश देतो, त्यालाही ते मनाई करतात. त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे!


ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना दोषी ठरवण्यात यावे, म्हणून असे होईल.


बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे.


उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये;


पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.


भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan