Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या गौरवशाली सामर्थ्यापासून दूर करण्यात येऊन शाश्वत विनाश ही शिक्षा मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9-10 आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायी आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:9
38 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’


त्यानंतर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने व महान वैभवाने येताना पाहतील.


त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा.


तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”


मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे झाले असते!”


तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’


परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’


त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”


पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.


शांती व सुरक्षितता आहे, असे ते म्हणतात, तेव्हा अकस्मात नाश ओढवेल! गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात प्रसूती वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा नाश होईल; त्यांचा निभाव लागणार नाही.


मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, ज्यामुळे तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठोर दंडास पात्र ठरेल?


हे लोक कोरड्या झऱ्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड अंधार राखलेला आहे.


पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत.


हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत.


तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan