Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्या दिवशी आपल्या पवित्र लोकांकडून गौरव मिळविण्यासाठी आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी अचंबित व्हावे म्हणून तो येईल. तुम्हीही त्यात सहभागी व्हाल कारण आम्ही दिलेल्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:10
40 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”


त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ माझ्या पित्याला माहीत आहे.


जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल.


न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’


मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम नगराला परमेश्वर अधिक दया दाखवील.


ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”


जे माझे आहेत ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे माझा गौरव झाला आहे.


आणि बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, ख्रिस्ताचा दिवस ते उघडकीस आणील, कारण तो दिवस अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे, ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.


आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचा गौरव केला.


सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या.


हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी


त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे.


ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले.


ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे.


आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.


बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे.


त्याच्या राज्यात व वैभवात तुम्हांला पाचारण करणाऱ्या देवाला शोभेल असे तुम्ही वागावे.


दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.


अशा प्रकारे आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपल्या प्रभू येशूच्या नावाला तुमच्यामध्ये व तुम्हांला त्याच्यामध्ये गौरव मिळेल.


बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे.


न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan