Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण जर परमेश्वराने पाप करणार्‍या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:4
25 Iomraidhean Croise  

त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा.


अचानक ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला छळायला येथे आला आहेस काय?”


आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”


त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला, हे मी पाहिले.


ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.”


तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे.


जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुझा बचाव करील काय?


ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही देणार नाही काय?


सामर्थ्याने व अधिकाराने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत.


त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेशहर नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


ज्या देवदूतांनी आपल्या अधिकारपदाची मर्यादा न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे.


नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan