Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:3
43 Iomraidhean Croise  

[अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]


मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”


म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.


येशू बोलत असतानाच लोकसमुदाय आला. यहुदा नावाचा बारामधला एक जण त्याचे नेतृत्व करीत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला.


तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”


कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.


आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे!


शांती व सुरक्षितता आहे, असे ते म्हणतात, तेव्हा अकस्मात नाश ओढवेल! गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात प्रसूती वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा नाश होईल; त्यांचा निभाव लागणार नाही.


तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा,


तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत.


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात.


ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा,


तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.


तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर सेवावृत्तीने करा.


चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यासबंधाने तुम्हांला कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहिले आहे.


पूर्वीच्या काळी खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक निर्माण होतील, ते विध्वंसक, असत्य मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले, त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.


पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल.


हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


सदोम, गमोरा आणि सभोवतालची नगरे येथील लोक त्या देवदूतांसारखे वागले आणि त्यांनी विकृत, अनैतिक, लैंगिक वर्तन केले. सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली ही नगरे स्पष्ट इशारा म्हणून सर्वांच्या पुढे ठेवली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan