Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तसेच त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, आणि त्यांच्या वर्तनामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पुष्कळजण त्यांच्या अनैतिक कृत्यांचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:2
36 Iomraidhean Croise  

त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही.


कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.


परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.


ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आपण खरे असून कोणाची भीड बाळगत नाही. आपण व्यक्तीनुसार नव्हे तर सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही? आम्ही तो भरावा की भरू नये?”


कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील.


येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


परंतु विरोधी यहुदी लोकांनी यहुदीतरांचे मन बंधुजनांविरुद्ध चिथवून कलुषित केले.


ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!”


तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.


परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला.


पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला.


तरीही मी आपणासमोर इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते चुकीचा मार्ग म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो


‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.


ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये;


त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.


टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.


यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.


पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.


ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.


भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.


नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.


आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.


पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल.


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


सदोम, गमोरा आणि सभोवतालची नगरे येथील लोक त्या देवदूतांसारखे वागले आणि त्यांनी विकृत, अनैतिक, लैंगिक वर्तन केले. सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली ही नगरे स्पष्ट इशारा म्हणून सर्वांच्या पुढे ठेवली आहेत.


तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.


जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.


जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan