Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या मागे लागणारे व देवाचा अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खोटे धर्मशिक्षक उद्धट, स्वच्छंदी आणि थोरांची निंदानालस्ती करण्यास न भिणारे असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:10
38 Iomraidhean Croise  

तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते.


त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग प्रतिनिधी पाठवून कळवले, ‘ह्याने आम्हांवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही.’


पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा उच्च याजक आहे, हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नकोस, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”


म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही.


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,


कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.


संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे.


लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा.


तर मग पृथ्वीवरील तुमच्या दैहिक वासना म्हणजे लैंगिक अनैतिकता, अमंगळपणा, कामवासना, दुष्ट प्रवृत्ती व लोभम्हणजेच एक प्रकारची मूर्तिपूजा, ह्यांना मूठमाती द्या.


देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे.


माणसे आत्मकेंद्रित, धनलोभी, बढाईखोर, अहंकारी, दुर्भाषण करणारी, आईबापांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र,


ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा,


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील,


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.


हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan