Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:3
39 Iomraidhean Croise  

तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही देणार नाही काय?


ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याबरोबरच्या सहभागात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.


परंतु त्याने मला म्हटले, ‘माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस पोहचते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


म्हणून प्रभूमध्ये बंदिवान असा मी तुम्हांला विनंती करून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला.


तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा,


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.


कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे; ते सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले. सर्व विश्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.


त्याच्या राज्यात व वैभवात तुम्हांला पाचारण करणाऱ्या देवाला शोभेल असे तुम्ही वागावे.


देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे.


देवाने तुम्हांला आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.


शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.


त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली.


तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.


उलट, तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचारणात पवित्र व्हा.


तुम्हांला तारणासाठी श्रद्धेद्वारे देवाच्या सामर्थ्याने सुरक्षित राखण्यात आले आहे. हे तारण शेवटच्या काळी प्रकट होणार आहे.


ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे.


पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.


वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.


आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.


तर मग बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही


देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,


ज्ञानात आत्मनियंत्रणाची, आत्मनियंत्रणात धीराची, धीरात धार्मिकतेची,


कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात तुम्ही सक्रिय व फलद्रूप व्हाल.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.


आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan