Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 या जगाच्या अधिपतीने विश्वासणार्‍यांची मने आंधळी केली आहेत, म्हणून शुभवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, ते पाहू शकत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 4:4
42 Iomraidhean Croise  

जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे.


शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.


देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.


आता ह्या जगाचा न्याय होत आहे. आता ह्या जगाचा सत्ताधीश बाहेर फेकला जाईल.


येशूने त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश असेल, तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याकडे प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा. जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे जातो, हे कळत नाही.


त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, माझ्याकडे वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.


जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठवले त्यालाही पाहतो.


ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा सत्ताधीश येत आहे. पण त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही.


जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत, ती मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी माझी कृत्ये पाहिली आहेत तरी ते माझा व माझ्या पित्याचाही द्वेष करतात.


आणि न्यायनिवाड्याविषयी, कारण ह्या जगाच्या सत्ताधीशाचा न्याय झाला आहे.


येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’


त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.”


तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.


यात हेतू हा की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.


असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले.


अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का?


परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते.


मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे.


अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.


त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता.


कारण आपले युद्ध मानवी शक्तीबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर व अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे.


तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही,


येशू अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व निर्मितीत प्रथम जन्मलेला आहे;


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


धन्यवादित देवाच्या गौरवशाली शुभवर्तमानाला जी साजेशी आहे ती शिकवण आमच्याकडे सोपविण्यात आली आहे.


तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.


कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले


म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल.


पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे, अंधारात चालतो आणि तो कोठे चालला आहे, हे त्याचे त्यालाच कळत नाही, कारण अंधाराने त्याच्या डोळ्यांवर अंधत्व आणलेले आहे.


तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती ख्रिस्ताच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशी आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता उजळत आहे.


सगळे जग त्या दुष्टाला वश झालेले असले, तरीही आपण देवापासून आहोत, हे आपल्याला ठाऊक आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan