Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून, करिंथ येथील परमेश्वराची मंडळी आणि अखया प्रांतातील चहूकडील सर्व पवित्र लोकांस:

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 1:1
31 Iomraidhean Croise  

पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते.


कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे.


माझा सहकारी तीमथ्य व माझे यहुदी बंधू लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला शुभेच्छा देतात.


जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे.


यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका,


तेथे तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ आपल्याच घरी असल्यासारखे राहावे, असे त्याचे आदरातिथ्य करा; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे.


बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनच्या घराण्याची माहिती आहे. ते अखया येथील प्रथम फळ आहे आणि त्याने स्वतःला पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.


ख्रिस्तामध्ये माझी प्रीती तुम्हां सर्वांवर असो, आमेन.


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत.


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची जी घोषणा आमच्याकडून म्हणजे सिल्वान, तिमथ्य व माझ्याकडून, तुमच्यामध्ये झाली ती होय-नाही अशी नव्हती, तर त्याच्यामध्ये होय अशीच ठाम स्वरूपाची होती.


माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले.


माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही.


कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने सांगत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आहे आणि ह्या तुमच्या आवेशाने तेथील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.


मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला


तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात.


येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून:


फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:


देवपित्यामध्ये व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेली थेस्सलनीकाकरांची ख्रिस्तमंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून: तुम्हांला कृपा व शांती मिळो.


ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा.


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यामध्ये असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या ख्रिस्तमंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून:


देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला:


देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून,


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना


आपला बंधू तीमथ्य ह्याची तुरुंगातून सुटका झाली आहे, हे मी तुम्हांला कळवू इच्छितो. तो लवकर आला, तर मी तुमच्या भेटीस येईन तेव्हा त्याला बरोबर आणीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan