Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:5
34 Iomraidhean Croise  

झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते.


आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”


अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतः आत जात नाही व जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही.


मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही.


बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.


हे सोडून कित्येक लोक निरर्थक चर्चेकडे वळले आहेत.


तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा,


तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत.


परंतु अमंगळ दंतकथांपासून व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि भक्तीविषयी प्रयत्नशील राहा.


शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.


समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो.


आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा.


यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत,


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात.


ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.


ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!


त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.


दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, पीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मानवी जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही.


कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan