Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे विकृत झालेला आहे. ह्यामुळे हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे सारे उत्पन्न होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तर तो गर्वाने फुगलेला आहे; त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे; ह्यांपासून1 हेवा, कलह, अपशब्द, दुसर्‍यांविषयीचे दुष्ट संशय उत्पन्न होतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:4
44 Iomraidhean Croise  

तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.


परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे म्हणून तुमचे तुम्हीच पाहून घ्या. अशा गोष्टींचा न्याय करणे मी नाकारतो!”


त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणी तरी मोठे आहोत, असे तो दाखवत असे.


परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका.


दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.


जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका.


परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील.


मात्र जर कोणी वितंडवादी असला तर माझे एवढेच म्हणणे आहे की, आपल्यात आणि देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांतही दुसरी कोणतीही रीत नाही.


कारण पहिल्या प्रथम तुम्ही ख्रिस्तमंडळी ह्या नात्याने एकत्र जमता, तेव्हा तुमच्यामध्ये दुही आहे असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो.


कोणी स्वतःला फसवून घेऊ नये, ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत, असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे.


तुम्ही अजूनही ऐहिक लोकांसारखे आहात. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी प्रवृत्तीने चालता की नाही?


कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.


आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये.


आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.


कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात.


जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा.


स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना.


आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो.


तो नाशाचा पुत्र, विरोधक असून तथाकथित प्रत्येक दैवत किंवा पूज्य म्हणून म्हणतात त्या वस्तूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणजे ‘मी देव आहे’, असे स्वतःचे प्रदर्शन करीत तो देवाच्या मंदिरात जाऊन बसेल.


व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे.


ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी ठामपणे सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही.


त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्‍व असावा.


तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.


मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे.


विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,


परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत.


माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा.


पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.


भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.


हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.


मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही, असे तू म्हणतोस, परंतु तू किती निकृष्ठ व तिरस्करणीय आहेस, हे तुला माहीत नाही! तू गरीब, आंधळा व उघडानागडा आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan