Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:17
62 Iomraidhean Croise  

मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.


नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!


ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या.


संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता.


ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे.


शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. तरीही येशू त्यांना पुढे म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे!


तेथे पाहा, जक्कय नावाचा एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार होता व श्रीमंत होता.


तो त्यांना उत्तर देत असे, “ज्याच्याजवळ दोन सदरे आहेत, त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्यात दुसऱ्यांना सहभागी करावे.”


त्याने त्याच्या सत्कृत्यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सादर केले आहेत. तो आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला देतो आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त करतो.”


तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले.


त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.


ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा.


लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा.


ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा.


तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व


मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे


तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.


आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.


देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,


परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात;


ऐहिक सुख प्रिय मानून देमास मला सोडून थेस्सलनीकाला गेला. क्रेस्केस गलतीयाला निघून गेला व तीत दालमतियाला गेला.


ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे.


देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.


आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan