Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 जी विधवा खरोखरीची विधवा आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:5
27 Iomraidhean Croise  

शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा:


तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे.


ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, मी तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुदी लोकांनी आरोप ठेवला आहे.


काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.


पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले, त्याच्यासभोवती सर्व विधवा जमा झाल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता, ती जे अंगरखे व जी वस्त्रे तयार करत असे ती त्यांनी रडत रडत त्याला दाखवली.


त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले.


म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे.


त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो.


जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते.


परमेश्वराचे साहाय्य मागत ह्या सर्व गोष्टी प्रार्थना करून मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ह्याकरिता जागृत राहून चिकाटी बाळगा; सर्व पवित्र जनांसाठी सातत्याने धावा करा.


कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.


सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत.


मात्र जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात विधवा असल्या, तर त्या व्यक्तीने त्यांची देखभाल करावी, ख्रिस्तमंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये, म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची ख्रिस्तमंडळीला तरतूद करता येईल.


ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.


मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.


कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही पतीच्या अधीन राहून आपले अंतरिक सौंदर्य जोपासत असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan