Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस, आणि दुसर्‍यांच्या पापात तुझे अंग असू नये; स्वतःला शुद्ध राख.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:22
18 Iomraidhean Croise  

त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली व त्यांची रवानगी केली.


परंतु ऐकणारे त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे तारण झाले नाही तर त्याचा दोष तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आत्तापासून मी यहुदीतरांकडे जाणार.”


म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही


त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.


अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा.


त्यांची अगोदर पारख व्हावी आणि ते निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी डीकन म्हणून सेवा करावी.


ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा.


त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्‍व असावा.


कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.


तुझ्यावर वडीलजनांनी हात ठेऊन प्रार्थना केली, त्या वेळी संदेशाद्वारे मिळालेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.


मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर;


पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील.


बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये.


कारण जो त्याचे स्वागत करतो, तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील कोणतीही विपत्ती ओढवू नये म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan