Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 परंतु अमंगळ दंतकथांपासून व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि भक्तीविषयी प्रयत्नशील राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:7
20 Iomraidhean Croise  

ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो.


व अफवांना खतपाणी घालणाऱ्या दंतकथा व प्रदीर्घ वंशावळ्या ह्यामध्ये त्यांनी गुंतून राहू नये तर श्रद्धेने ईश्‍वरी योजना जाणून घेता येते, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे.


तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,


तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.


हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.


हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;


जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही,


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.


अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो.


मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे.


ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल


आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा.


ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल.


ह्यासाठी की, त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांचे आदेश ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे.


ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे.


परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत.


पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan