Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:6
39 Iomraidhean Croise  

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”


म्हणूनच, महाशय, ह्या सर्व माहितीचा मुळापासून काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की, त्या आपणासाठी व्यवस्थितपणे लिहून काढणे उचित ठरेल.


काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला,


मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा.


सर्व गोष्टींत मी कित्ता घालून दिला आहे. तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना साहाय्य करावे आणि ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे’, असे जे शद्ब प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”


परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे.


ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे. तो ख्रिस्ती जीवनामध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. जसे मी सर्वत्र प्रत्येक ख्रिस्तमंडळींत शिकवितो, त्याप्रमाणे तो ख्रिस्तामध्ये माझ्या जीवनशैलीची तुम्हांला आठवण करून देईल.


ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी सक्षम केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख ठार करतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग,


माझे कसे काय चालले आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून आपला प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक तुखिक तुम्हांला सर्व काही कळवील.


तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही.


तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे.


तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.


शरीराचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताला त्याने सोडून दिलेले असते. ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सर्व शरीर सांधे व मज्जा यांच्यायोगे दृढ जोडले जाते व त्याची ईश्वरी इच्छेनुसार वाढ होत जाते.


ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा.


आपला प्रिय बंधू तुखिक, प्रभूच्या कार्यातील विश्वासू प्रसेवक व माझ्या सोबतीचा सेवक हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हांला कळवील.


ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा.


जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे.


स्वतःकडे व आपण देत असलेल्या धर्मशिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यात टिकून राहा. असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील.


जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही,


मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर;


परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस.


लोक सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु आपल्याच इच्छेप्रमाणे ऐकण्याची आवड धरणारे बनून आपणाभोवती शिक्षकांची गर्दी जमवतील,


तू मात्र जे शिक्षणाला अनुसरून आहे, ते शिकव.


प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नव्याने जन्मलेल्या बालकासारखे निरश्या दुधाची इच्छा धरा.


ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ह्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.


प्रभूने इजिप्त देशातून आपल्या लोकांना मुक्त केले परंतु नंतर जे विश्वासहीन झाले, त्यांचा त्याने नाश केला, हे तुम्हांला ठाऊक आहेच. तरीही मी तुम्हांला त्याची आठवण करून देऊ इच्छितो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan