Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:1
64 Iomraidhean Croise  

अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार!


येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार!


तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील.


ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”


एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांपैकी कित्येक तत्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो.” कारण पौल येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत असे.


केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे.


त्याने आमच्याकडे येऊन पौलाच्या कमरबंदाने स्वतःचे हातपाय बांधले व म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की, “हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेममध्ये यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून यहुदीतरांच्या हाती देतील.”


त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की,


तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.


तुमच्यामध्ये दुही असावी कारण त्या दुहीमुळे खरे कोण आहेत हे उघड होईल.


ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.


परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो.


सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;


आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो.


परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.


ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व दंतकथांकडे वळतील, अशी वेळ येईल.


ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे.


ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.


पूर्वीच्या काळी खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक निर्माण होतील, ते विध्वंसक, असत्य मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले, त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील,


माझ्या मुलांनो, ही शेवटची घटका आहे! ख्रिस्तविरोधक येणार, असे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत आणि ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटची घटका आहे.


परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.


ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.


ते चमत्कार करणारे मृतांचे आत्मे आहेत, ते सर्वसमर्थ देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात.


तो जोरदार वाणीने म्हणाला, “पडली! महान बाबेल पडली. ती भुतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे.


दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चमत्कार करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे!


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.


नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.


आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांना लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी आहे.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!


त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही


Lean sinn:

Sanasan


Sanasan