Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 ख्रिस्तमंडळीमधल्या प्रत्येक उपासनेत पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 2:8
48 Iomraidhean Croise  

येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल.


परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर


[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]


त्यानंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.


येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान.


तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता.


‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे.


तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?”, त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व दानधर्म हे देवापुढे आठवणीसाठी पोहचले आहेत व तो तुला उत्तर देणार आहे.


परंतु सात दिवसांनंतर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला शहराबाहेर पोहचविले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:


खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.


परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो!


बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे.


मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही.


ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये;


हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत


म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ.


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात स्वच्छ करा, अहो, ढोंगी लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


पतींनो, तुम्हीही पत्नींबरोबर त्या अधिक नाजुक आहेत म्हणून सुज्ञतेने वागा, कारण तुमच्याबरोबर त्यादेखील देवाने दिलेली जीवनाची देणगी स्वीकारतील, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan