Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3-4 मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 1:3
24 Iomraidhean Croise  

इफिस नगरात आल्यावर पौलाने प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांना तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन त्याने यहुदी लोकांबरोबर चर्चा केली.


उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला.


कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;


कारण तुम्ही आनंदाने असा माणूस खपवून घेता जो, आम्ही ज्याची घोषणा केली नाही, अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आत्म्यापेक्षा निराळा आत्मा तुम्ही स्वीकारता अथवा तुम्ही स्वीकारलेल्या शुभवर्तमानापेक्षा निराळे शुभवर्तमान स्वीकारता व सहजपणे तुम्ही त्याच्या आहारी जाता.


त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन.


हे निर्देश त्यांना शिकव व त्यांनी पाळण्याचा आग्रह धर.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


त्यांनी दोषविरहित व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन कर.


कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.


जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही,


न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.


फसवणूक करणारी, म्हणजेच येशू ख्रिस्त मानव म्हणून आला हे मान्य न करणारी, पुष्कळ माणसे जगात वावरत आहेत. असा मनुष्य फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधी आहे.


तथापि तुला काही गोष्टींविषयी दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. त्या ह्या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाक ह्याला इस्राएली लोकांना मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व अनैतिक लैंगिक कृत्ये करणे, ही पापे करण्यासाठी प्रवृत्त केले.


परंतु तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेश देणारी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan