Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आदेशानुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, विश्वासातील माझे एकनिष्ठ लेकरू तीमथ्य ह्याला:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 1:1
38 Iomraidhean Croise  

व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे,


तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे!


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.


ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:


करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना,


हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे.


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.


मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला


बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही.


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वत: आणि ज्याने कृपेद्वारे आपल्यावर प्रीती करून आपल्याला शाश्‍वत प्रोत्साहन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता,


ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो.


हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.


आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते.


आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.


आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे.


त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर.


जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला,


देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.


तुम्ही त्याच्याद्वारे विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे.


त्या आपल्या उद्धारक अशा एकमेव देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे वैभव, ऐश्वर्य, सामर्थ्य व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता व युगानुयुगे असोत! आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan