Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 5:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 5:9
23 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे झाले असते!”


स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे: त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचे अधिकारपद दुसरा घेवो.


हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.”


हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला.


पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.


तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले.


त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.


तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.


जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली.


जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली.


निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.


तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुमच्यावर दया झाली नव्हती, आता तर दया झाली आहे.


तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!


कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan