Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 5:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 5:21
40 Iomraidhean Croise  

तसेच उचित काय आहे, हे तुमचे तुम्ही का ठरवत नाही?


तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.


नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.


तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.”


शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.”


तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले.


देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.


माणसाच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्याच्या स्वतःच्या आत्म्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही.


तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे.


प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या.


जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे


तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.


कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.


वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.


तर मग बंधूंनो, तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे सत्य आम्ही तुम्हांला शिकविले त्यात स्थिर राहा व ते घट्ट धरून ठेवा.


जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत.


त्यांच्यापैकी काही लोक दुसऱ्यांच्या घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या,


तांबट आलेक्सांद्र ह्याने मला पुष्कळ त्रास दिला. त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.


आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे.


प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.


तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले.


एवढेच करा की, जे तुम्हांला मिळाले आहे, ते मी येईपर्यंत दृढ धरून ठेवा.


मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव.


म्हणून तू जे ऐकले व स्वीकारले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चात्ताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हेदेखील तुला कळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan