Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 5:10
21 Iomraidhean Croise  

जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”


मी चांगला मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.


मी माझा प्राण देतो तो पुन्हा परत घेण्याकरता, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.


आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही.


तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे.


मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला.


तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत.


ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये.


आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.


नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.


म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे.


त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे


हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.


आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.


त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही क्रुसावर वाहिली, ह्यासाठी की, आपण पाप करणे सोडून देऊन सदाचरणासाठी जगावे. त्याच्या जखमांनी तुम्ही निरोगी झाला आहात.


आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan