1 थेस्सल 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्यांना प्रभू शिक्षा देतील. Faic an caibideil |
पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.