Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 4:3
47 Iomraidhean Croise  

जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”


अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.


परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.


‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील.


जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”


येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे.


जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल.


उलट त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा;


त्या गोष्टी म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म हे तुम्ही वर्ज्य करावे, ह्यांपासून स्वतःला दूर ठेवाल तर तुमचे हित होईल. तुमचे कल्याण असो.


आता मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो, तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन द्यावयास समर्थ आहे.


त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’


सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते.


देवाची इच्छा काय आहे म्हणजेच त्याच्या दृष्टीने चांगले, ग्रहणीय व परिपूर्ण काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.


परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते.


तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात.


परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहावयास लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण केलेल्या अनैतिक गोष्टींचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला अश्रू ढाळावे लागतील.


देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा,


तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे, हे समजून घ्या.


केवळ त्यांना खुश करणाऱ्या तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा.


म्हणूनच तुमच्याविषयी आम्ही ऐकले तेव्हापासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत की, त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञान व आध्यात्मिक सुज्ञता व समज तुम्हांला प्राप्त होवो.


तर मग पृथ्वीवरील तुमच्या दैहिक वासना म्हणजे लैंगिक अनैतिकता, अमंगळपणा, कामवासना, दुष्ट प्रवृत्ती व लोभम्हणजेच एक प्रकारची मूर्तिपूजा, ह्यांना मूठमाती द्या.


ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे.


कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत.


तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे.


सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.


शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो.


बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.


तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनांनुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हांला सहनशक्तीची आवश्यकता आहे.


तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


म्हणून तुम्ही आपले ऐहिक आयुष्य मानवी वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. मात्र देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा सर्व काळ जगतो.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan