Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 4:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 4:12
15 Iomraidhean Croise  

त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते.


वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा.


दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.


चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.


बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. प्रत्येक संधीचा पूरेपूर उपयोग करा.


वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.


शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे,


यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.


स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan