Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हांला सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगायची आहेत; आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 वास्तविक, आम्ही तुमच्याकडे असतानाच, आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपला छळ होईल आणि त्याप्रमाणे घडून आले, हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 3:4
12 Iomraidhean Croise  

सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे.


पौल व सीला अंफिपुली व अपुल्‍लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर होते.


परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले.


परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.


बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या ख्रिस्तमंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणजे त्यांनी यहुदी लोकांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीदेखील आपल्या देशबांधवांच्या हातून सहन केलीत.


पूर्वी फिलिप्पै येथे आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, तीव्र विरोधाला तोंड देत असतानाही देवाचे शुभवर्तमान तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले, हे तुम्हांला माहीतच आहे.


मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?


आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan