Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 3:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 देव, आपला पिता हा स्वत:, व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 3:11
28 Iomraidhean Croise  

जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील.


अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.


आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत?


ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे.


तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.


उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.


अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’


जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.


हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे.


येशूने तिला म्हटले, “मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जात आहे.”


येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला


मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.


देव आपला पिता तुम्हांला कृपा व शांती देवो.


अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.


आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील.


शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो.


आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वत: आणि ज्याने कृपेद्वारे आपल्यावर प्रीती करून आपल्याला शाश्‍वत प्रोत्साहन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता,


शांतीचा उगम असलेला प्रभू स्वतः सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हां सर्वांबरोबर राहो.


देवाच्या प्रीतीची व ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या सहनशीलतेची प्रभू तुम्हांला अधिक प्रगल्भ समज देवो.


आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही.


मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan