Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 यहुदीतरांचे तारण व्हावे म्हणून आम्ही संदेश देतो, त्यालाही ते मनाई करतात. त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत रहावे; त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आम्ही त्यांच्याशी संवाद करू नये, जेणे करून गैरयहूदीयांचे तारण होईल, म्हणून ते आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते आणि अशा रीतीने त्यांच्या पापांचे माप भरत आले आहे. परंतु आता शेवटी परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:16
52 Iomraidhean Croise  

नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”


तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा.


सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून देवराज्याच्या ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली जाईल आणि नंतर शेवट होईल.


तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे. त्याने तो त्याच्या खळ्यातील धान्य पाखडून गहू कोठारात साठवील पण भूस मात्र कधीही न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”


जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल.


पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.


यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले.


पिसिदियामधील अंत्युखिया येथून व इकुन्य येथून कित्येक यहुदी आले, त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला, असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.


परंतु विरोधी यहुदी लोकांनी यहुदीतरांचे मन बंधुजनांविरुद्ध चिथवून कलुषित केले.


त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता काही परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.


परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले.


परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला.


तुमच्याविषयी त्यांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही यहुदीतरांत राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मोशेच्या नियमशास्राचा त्याग करावयास शिकवता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगता.


दिवस उगवल्यावर, काही यहुदी लोक एकजूट करून शपथ घेऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.”


ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहुदी लोकांनीही दुजोरा दिला.


तेव्हा उच्च याजक व यहुदी लोकांमधील पुढारी ह्यांनी त्याच्याकडे पौल विरुद्ध फिर्याद नेली


तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.


तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”


असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला.


तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.


बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता.


म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत.


सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे


त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.


व ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुष्ट फसवेगिरीचा प्रयोग करील कारण त्यांनी तारणासाठी ज्या सत्याचे स्वागत करून आवड धरायला हवी होती, ते केले नाही.


त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे.


पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल.


दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan