Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तुम्हांला ठाऊक आहे की, बाप आपल्या मुलांना बोध करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आवर्जून विनंती करीत सांगत होतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:11
40 Iomraidhean Croise  

तिथे मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने जाऊन त्यांना सावध करावे.’


त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो अखया प्रांतात गेला.


प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये.


तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;


कोणी ह्या गोष्टीचे उल्‍लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते.


म्हणून ज्याप्रमाणे आता तुम्ही करीत आहात, त्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्या व एकमेकांची उभारणी करा.


बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, आळशी लोकांना ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.


मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?


अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.


देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


त्यांनी दोषविरहित व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन कर.


सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.


ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.


ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.


तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे, म्हणून त्यांना बोध कर.


दासांनी आपल्या धन्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये,


बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan